जामनेर ;- ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर ४ गावात पोटनिवडणूक ५ रोजी घेण्यात आली होती. ६ रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या मतमोजणीत नेहमीप्रमाणे भाजपने आपला वरचष्मा कायम राखला. या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या निवासस्थानी सर्व विजयी उमेदवारांचे कौतुक केले असून १७ ग्रामपंचायतीवर आपला दावा सांगितला आहे.
तालुक्यातील सरपंचपदाचे विजयी उमेदवार (कंसात गाव )
विठ्ठल विश्वनाथ सोन्ने (गोंडखेळ), चंद्रकला सीताराम वाघ (गोरनाळे), महेंद्रसिंग मोहनसिंग नाईक (कापूसवाडी), रजनी रमेश नाईक (खडकी), चंद्रभागा रामचंद्र पाटील (नांद्रा हवेली), मुक्ताबाई भागवत खवडे (नवीदाभाडी), अनिल दत्तू महाजन (सामरोद), जितेंद्र बाबुराव पाटील (शहापूर), अनिता भिकारी जाधव (शिंगाईत), अंजनाबाई ईश्वर पाटील (तोरनाळा), सुभाष त्र्यंबक पाटील ( दोंदवाडा), दीपाली प्रदीप पाटील (एकुलती), शांताराम कडू पाटील (सवतखेडा), वंदना भाऊराव मोरे (टाकळी बुद्रुक), रेणुका अरूण राठोड ( पठाडतांडा), अफजल ईस्माइल तडवी (पहूर पेठ), (बिनविरोध) मंगलाबाई माधव महाजन ( गारखेड़ा खुर्द).
विजयी उमेदवार
सुनसगाव माधव हरी बावस्कर, हिवरखेडा त. वा. रेश्माबाई फकिरचंद तडवी व रहेमान मामुर तडवी, नांद्रा प्र.लो. सरलाबाई बाबुराव पाटील, वाकोद ज्ञानेश्वर सुपडू राऊत, कृष्णा पिराजी जोशी, प्रकाश गोविंदा गाढवे व अर्चना दीपक गायकवाड.
पोटनिवडणुकीत बिनविरोध झालेले उमेदवार
रोटवद विनायक भिका पाटील, वाकडी अरबी रज्जाक तडवी, मुनिर अब्दुल तडवी, रत्न सुरेश बावणे, दिलीप गोविंद परदेशी. देवळसगाव येथील पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने ही जागा रिक्त असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली.