Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ब्रेकिंग»१० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
    ब्रेकिंग

    १० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 7, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तेल अवीव : इस्रायल व हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात १० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने सोमवारी पहाटे संपूर्ण गाझा शहराला वेढा घातला. हमासचा वरचष्मा असलेल्या गाझा शहराच्या उत्तर भागाचा तेथील अन्य भागांशी संपर्क तोडण्यात आला.

    इस्रायली सैन्य गाझा शहरात कोणत्याही क्षणी प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे खूप मोठा संहार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    गाझात इस्रायल सैन्याने प्रवेश केल्यास त्यांच्याशी कडवी झुंज देण्याचे हमासने ठरविले आहे. त्या शहरातील लोक इस्रायली सैन्याशी लढण्याकरिता रस्त्यावर उतरणार आहेत, असे हमासने म्हटले आहे. त्यामुळे मृत व्यक्ती व जखमींच्या संख्येतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. इस्रायलने कोंडी केल्यामुळे गाझामध्ये इंधन, औषधी, अन्नधान्य अशा जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. तेथील शाळांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अख्यत्यारीतील संघटनांनी मदत छावण्या सुरू केल्या आहेत.

    पश्चिम आशियातील चिंताजनक स्थिती व इस्रायल-हमास संघर्षाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद इब्राहिम रईसी यांच्याशी सोमवारी दूरध्वनीवरून चर्चा केली. दहशतवादी हल्ले, हिंसाचार व निरपराध व्यक्तींचे होत असलेले मृत्यू याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एका पत्रकात म्हटले आहे की, युद्धग्रस्त भागातील नागरिकांना मानवतावादी दृष्टिकोनातून जीवनावश्यक गोष्टींची मदत पुरविणे, शांतता या गोष्टींवर मोदी व रईसी यांनी भर दिला आहे.

    अमेरिकेने मध्यपूर्वेतील आपल्या कमांडसाठी आण्विक पाणबुडी पाठवली आहे. ओहायो प्रकारच्या पाणबुड्या अण्वस्त्रांनी सुसज्ज आहेत. मध्यपूर्वेत, भूमध्य समुद्र, लाल समुद्र, पर्शियन गल्फ आणि ओमानच्या आखातात अमेरिकेची कमांड आहे. मात्र, अण्वस्त्र पाणबुडी कुठे तैनात करण्यात आली आहे, हे अमेरिकन लष्कराने सांगितले नाही. अमेरिकेच्या या कृतीने अरब देश संतापले आहेत.

    मानवतेच्या दृष्टिकोनातून युद्धविराम घेण्याची अमेरिकेची सूचना इस्रायलने फेटाळून लावली आहे. हमासने ओलिस ठेवलेल्या २४० जणांची तत्काळ मुक्तता करावी अशी मागणीही इस्रायलने केली होती. जॉर्डन, इजिप्त यांनी वारंवार इशारे देऊनही इस्रायल गाझातील कारवाई थांबविण्यास राजी नव्हता.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Hamas Israel Tel Aviv:
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू

    November 9, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    महाराष्ट्रासह ७ राज्यांत एसआयार मुदतवाढ

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif