जामनेर येथे घरफोडी ; साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला

0

जामनेर;- येथील शास्त्रीनगर भागात असणाऱ्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड आणि शेजारी राहणाऱ्या डॉक्टर यांच्या दवाखान्याचे कुलूप तोडून चार हजार रुपये रोख असा एकूण तीन लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबून नेल्याची घटना 14 जुलै रोजी सकाळी साडेचार ते साडेसहा वाजता दरम्यान उघडकीस आले. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती असते की सेवानिवृत्त कंडक्टर असलेले निवृत्ती माधव चौधरी वय 60 यांच्या घराच्या दरवाज्याचे उपलब्ध करून आज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून कपाटाचे लॉक तोडून त्यात 21 हजार रुपये किमतीची बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे अंगठी, 15000 किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्यातल्या रिंगा, 25000 रुपये किमतीचे तेरा ग्रॅम मोजण्याची सोन्याची पोत व मनी ,तीन हजार रुपये किमतीचे मेडिकल किट आणि तीन लाखांची रोकड असा एकूण तीन लाख 64 हजाराचा बुद्धिमान अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे 14 जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लक्षात आले. निवृत्ती चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.