‘रवींद्र महाजनी’ यांच्या अचानक निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या अचानक निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पुण्यातील तळेगाव फाभाडे इथल्या सदनिकेत ते मृतावस्थेत आढळले. तळेगाव दाभाडेमधील आंबी इथल्या क्सर्बिया सोसायटीमध्ये ते भाडेतत्वावर राहत होते. गेल्या आठ महिन्यांपासून ते या सदनिकेत मध्ये एकटेच राहत होते. तर रवींद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) हा मुंबईत वास्तव्यास आहे. रवींद्र महाजनी यांच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याने शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजता शेजाऱ्यांनी या संदर्भात पोलिसांना कळविले. महाजनी यांचा शेवटचा संवाद कोणाशी आणि कधी झाला याविषयी माहिती समोर आली. त्यांच्या इमारतीत हाऊस कीपिंगचं काम करणाऱ्या महिलेनं याबाबतीत प्रतिक्रिया दिली आहे.

महाजनी यांना मंगळवारी शेवटचं पाहिलं
“मी या इमारतीत दररोज कचरा गोळा करायला येते. मंगळवारी मी त्यांना शेवटचं बघितले होते. त्यानंतर मी त्यांना पहिलेच नाही. कचरा देतांना ते थोडंफार बोलायचे, तेवढंच. त्याशिवाय माझा त्यांच्याशी संवाद झाला नाही. काळ कचरा घायला आले तेव्हा दुर्गंधी येऊ लागली, मी माझ्या सरांना याबद्दल सांगितले. दररोज आवाज दिल्यावर ते मधून आवाज द्यायचे, पण काळ आतून काही आवाज आलाच नाही.” असे सफाई कर्मचारी आदिक वारंगे यांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी याबद्दल माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली. गश्मीर तळेगाव दाभाडेला पोहोचल्यावर महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, गश्मीरची आई आजारी असल्यामुळे अद्याप त्यांना कसलीच माहिती देण्यात आलेली नाही. सोबतच गश्मीर महाजनी याची सुद्धा यावर काहीच प्रतिक्रिया नाही आली आहे. त्यामुळे महाजनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पुठे पार पडेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.