भीषण अपघात; बस दरीत कोसळली, 11 जण जागीच ठार

0

श्रीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे आज भीषण अपघात झाला.  पुंछच्या सवजियान भागात आज पहाटे एक मिनी बस दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

11 जणांचा मृत्यू 

या घटनेची माहिती मंडी तहसीलदार शहजाद लतीफ (Tehsildar Shehzad Latif) यांनी दिली. या अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी लष्कराचं बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून जखमींना मंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडालीय.

5 लाखांची मदत जाहीर 

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पुंछ दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. जखमींना चांगले उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस मंडीहून सौजियानकडे जात होती. बसमध्ये 24-30 प्रवासी बसले होते. बुधवारी सकाळी बरेली नाल्यात बस रस्त्यावरून घसरली आणि खोल दरीत पडली.  मृतांचा आकडा वाढू शकतो कारण अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. रिपोर्टनुसार, मृतांमध्ये 5 आणि 14 वयोगटातील दोन मुलांव्यतिरिक्त तीन महिलांचाही समावेश असल्याचं म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.