मोठा दहशतवादी हल्ला, मशिदीत घुसून निवृत्त SSP ची हत्या

0

श्रीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. बारामुल्लातील गेंटमुल्ला इथं दहशतवाद्यांकडून मशिदीत घुसून रिटायर्ड एसएसपीवर गोळीबार करण्यात आला. रिटायर्ड एसएसपी मोहम्मद शफी हे मशिदीत अजान पठणासाठी येत असताना त्यांच्यावर हल्ला झाला.

जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी शिरी बारामुल्लातील गेंटमुल्ला इथं एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर परिसरात सुरक्षा दलांकडून शोध मोहिम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस आणि लष्कराचे जवान दाखल झाले आहेत. सध्या हल्ला करणाऱ्यांची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, मोहम्मद शफी यांच्या भावाने हा पूर्वनियोजीत हल्ला होता असं म्हटलं आहे.

पूँछमध्ये लष्कराकडून शोध मोहिम राबवली जात असताना बारामुल्लात ही घटना घडलीय. जम्मू काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात गुरुवारी शस्त्रास्त्रांसह दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन गाड्यांवर हल्ला केला होता. या दहशतवाद्या हल्ल्यात चार सैनिक शहीद झाले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.