नामांकित जळगाव जनता बँकेत 26 लाखांचा अपहार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नामांकित असलेली जळगाव जनता सहकारी बँकेत मोठा अपहार झाल्याची धक्कादायक बातमी आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव-जळगाव जनता सहकारी बँकेतील सहाय्यक पदावर असलेल्या पदाधिकाऱ्याने बँकेतील खातेदारांच्या खात्यातून बनावट स्लिप भरून विड्रॉल केले व बनावट मुदत ठेव पावती करून 26 लाख 24 हजार रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी बँक कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जळगाव जनता सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेमध्ये 26 सप्टेंबर 2020 ते 12 मे 2023 या कालावधीमध्ये बँकेतील सहाय्यक देविदास खंडू थोरात यांनी या काळात बँकेचे खातेदार सुमन भिकन कोतकर, उज्वला जयवंत कोतकर, जयवंत भिकन कोतकर यांच्या खात्यातून बनावट स्लिप भरून विड्रॉल केले व तेथेच बनावट मुदत ठेव पावती करून 26 लाख 24 हजार रुपयांचा अपहार केला.

तसेच बँकेने ठेवलेल्या मौल्यवान व दस्तावेज मुदत ठेव पावतीची चोरी करून त्याचे बनावटीकरन करून खातेदारांची फसवणूक केली. या प्रकरणी भास्कर निंबाजी साळुंखे (रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी देविदास खंडू थोरात यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी हे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.