काँग्रेसला झटका, माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर माजी मंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द झाली आहे. याबाबत राज्य सरकारने राजपत्र काढले आहे.

पाच वर्षांची शिक्षा

नागपूर जिल्ह्यातील सावनेर या विधानसभा मतदारसंघाचे सुनील केदार हे आमदार आहेत. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.  दोन दिवसांआधी नागपूरच्या सत्र न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा जास्तकाळाची शिक्षा सुनावली गेली. तर त्या विधिमंडळ सदस्याला आमदारपदी राहता येत नाही. त्याच नुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. केदार यांनी सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्याच दिवसापासून म्हणजे 22 डिसेंबरपासूनच त्यांची आमदारकी रद्द केली असल्याचं सरकारच्या राजपत्रात म्हणण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

नागपूर जिल्हा बँकेत 125 कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा उघडकीस आला. सुनील केदार हे तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2001 -02 मध्ये त्यांनी बँकेच्या रकमेतून होमट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रा मनी मर्चंट लिमिटेड आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकार प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या. सहकार विभागाच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही गुंतवणूक झाली होती. पुढे खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे बुडाले. या प्रकरणी केदार आणि अन्य आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून  त्यांना आता 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.