मोटारसायकल घसरल्याने अपघातात तीन जण जखमी

0

जळगाव ;- महामार्गावर दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील बच्छाव शोरूम जवळ घडली आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले .

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन पुंडलिक पाटील (वय-२२)रा. नशिराबाद ता.जि.जळगाव हा तरूण एमआयडीसीतील सुप्रिम पाईप कंपनीत कामाला आहे. सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारा नशिराबाद येथून जळगाव शहरात दुचाकीने येण्यासाठी निघाला. त्यासोबत दुचाकीवर तेजस्वी रविंद्र पाटील (वय-१७) आणि कृष्णा सोनू माळी (वय-७) रा. भवानी नगर, हे सोबत होते. नशिराबादकडून जळगाव शहरात येत असतांना रस्त्यावरील बच्छाव शोरूम समोरील महामार्गावर अचानक दुचाकीचा ताबा सुटल्याने दुचाकी घसरली. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने खासगी वाहनाने तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये सचिन पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघात प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.