जळगावात पोलिसांच्या सतर्कतेमुळे २५ गुरांना जीवदान…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगाव शहरात बकरी ईदनिमित्त मोठ्या प्रमाणावर गुरांची कत्तल होणार असल्याची गोपनीय माहिती जळगाव शहर पोलीस यंत्रणेला मिळताच शहरातील एका परिसरातुन तब्ब्ल २५ गोवंशाची पोलिसांनी सुटका केली असून या प्रकरणी सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी नगरात असेल्या मुघल गार्डन परीसरातील एका मोकळ्या जागेतुन २५ गोवंशाची पोलिसांनी कारवाई करीत सुटका केली. या प्रकरणी सहा संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बेकायदेशीररीत्या गोवंशाचे मांस आणि काही जनावरांना कोंबून ठेवल्याची गोपनिय माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांना मिळाली. त्यानुसार गुरूवार, २९ जून रोजी सकाळी आठ वाजता पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्यासह त्यांचे पथक आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी मुघल गार्डन परीसरात छापा टाकला. या कारवाईप्रसंगी गोवंशाचे मांस आणि निदर्यपणे कोंबून व बांधून ठेवलेल्या 25 गोवंशाची जनावरे मिळून आली. यात तब्बल ३ लाख ३७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यावेळी ही कारवाई जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार, भरतसिंह पाटील, बशीर तडवी, वाहेद तडवी, भास्कर ठाकरे, रतन गीते, तेजस मराठे, योगेश पाटील, कमलेश पाटील, राजकुमार चव्हाण, दीपक पाटील तर पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील, सचिन साळुंखे, किरण धमके, विजय काळे आदींच्या पथकाने केली.

 

यांना घेतले ताब्यात

संशयित वकार युनूस मोईद्दीन शेख (29, मोहमदीया नगर), इमरान खान रहेमान खान (38, मुघल गार्डन), शेख दानीश शेख इरफान (21, उस्मानिया पार्क), सैय्यद शहिद सैय्यद यासीन (32, भिलपूरा, जळगाव), जावेद शेख रशीद शेख (34, मुघल गार्डन) आणि मोहम्मद अयुब हकीमोद्दिन खान (32, मुघल गार्डन, जळगाव) यांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.