जळगावच्या तरुणाने पैसे घेऊन पाकिस्तानला पुरवली गोपनीय माहिती

0

ठाण्यातून अटक : एटीएसची कारवाई

मुंबई :-पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देणाऱ्या जळगावच्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली असून गौरव पाटील असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

गौरव पाटील हा जळगावचा असून तो मुंबईच्या नेव्हर डार्क याड मध्ये सहा महिन्याचे शिक्षण घेतले आहे. भारतातील प्रतिबंधक क्षेत्रातील गोपनीय समितीची माहिती ठाण्यातील एक संशयित देत असल्याची दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली होती. या पथकाने तांत्रिक  पुराव्याच्या मदतीने गौरव पाटील याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याची एप्रिल ते ऑक्टोबर 2023 च्या दरम्यान फेसबुक आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून पाकिस्तानातील दोन हस्तकांशी त्याची ओळख निर्माण झाली होती. याच ओळखीतून त्याने माहितीच्या बदल्यात पैसे स्वीकारल्याचे तपासांती समोर आल्याने त्याच्या संपर्कात असलेल्या आणखी तिघां विरोधात यु ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपींमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. तिसरा व्यक्ती चा शोध सुरू आहे दरम्यान गौरव यांनी आयटीआयचे शिक्षण घेतले असून नेव्हल डॉक यार्ड मध्ये त्याने सहा महिन्याची अप्रेंटिसशिप करून नंतर त्याने ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर केल्याचा संशय एटीएसला आहे तो ठाणे परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.