बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला सव्वातीन लाखांचा ऐवज

0

जळगाव:-घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून आठ प्रवेश करून सुमारे सव्वातीन लाखांचा ऐवज लांबविण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी बुधवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील द्रोपती नगर भागात राहणारे गणेश विलास निकम हे दोन रोजी कंपनीत कामानिमित्त गेले असता त्यांची पत्नी यादेखील तीन रोजी आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेल्या होत्या. त्यामुळे बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून आज प्रवेश करून टीव्ही सेट टॉप बॉक्स ,कपाटातील ,सोनसाखळी, अंगठ्या ,मंगळसूत्र, हार, अठरा हजार रोख असा सुमारे तीन लाख 24 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. निकम यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.