चोपड्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना सात वर्षाची शिक्षा

0

अमळनेर : चोपड्यातून अल्पवयीन मुलीला धमकी देऊन पळून नेणाऱ्या दोन जणांना येथील अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्या. पी. आर. चौधरी यांनी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

गुलाम रसूल शेख मस्तान मोमीन (२४, रा. मिल्लतनगर, चोपडा) आणि शेख मुज्ञ्जकीर हमीद पिंजारी (२५, रा. मण्यारअळी, चोपडा) अशी आरोपींची नावे आहेत.

 

चोपडा येथील एक अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना आरोपी गुलाम याने तिला धमकी देऊन बस द्वारे अमळनेर येथे येऊन त्याच्या मित्र शेख मुज्ञ्जकीर याला बोलावून घेतले. दोघेजण मुलीला घेऊन गांधलीपुरा भागात गेले. तेथे काही तरुणांनी त्यांना पाहिल्यावर पोलिसांना माहिती दिली. पोलिस पोहोचताच गुलाम हा पळून गेला. त्यानंतर दोघांनाही अटक करत त्यांच्याविरुध्द चोपडा शहर पोलिसांत पोक्सो आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अॅड. राजेंद्र चौधरी यांनी युक्तिवाद करून ११ साक्षीदार तपासले. रिक्षाचालक आणि गांधलीपुरा भागातील प्रत्यक्ष साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे, पोलिस नाईक हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर, अतुल पाटील यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.