जळगाव :-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. १२ डिसेंबर रोजी मोठ्या जल्लोषात झाला.
कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थनी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे, प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे प्रगतीशिल शेतकरी अशोक गाडे यांची उपस्थिती होती. याशिवाय कुलसचिव डॉ. विनोद पाटील, स्पर्धेचे समन्वयक प्रा.जे.व्ही. साळी, उपसमन्वयक डॉ. जितेंद्र नारखेडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे उपस्थित होते.
यावेळी परीक्षकांच्यावतीने प्रा. अतुल शिरखेडकर यांनी तर सहभागींच्या वतीने हिमानी महाजन (जळगाव) यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हास्तरावरून विद्यापीठ स्तरावरील संशोधन स्पर्धेसाठी ३४७ प्रवेशिकांची निवड करण्यात आली होती. ११ डिसेंबर रोजी पहिल्या फेरीत सादरीकरण केल्यानंतर १५२ प्रवेशिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. बुधवारी विद्यापीठाच्या विविध सहा प्रशाळांमध्ये या प्रवेशिकांचे सादरीकरण झाले. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. पारितोषिक वितरण प्रसंगी बोलतांना अशोक गाडे म्हणाले की, निरीक्षण, परीक्षण आणि सर्मपण हे गुण अविष्कार निर्मितीसाठी आवश्यक आहे. श्री. गाडे यांनी यावेळी स्वत:चे अनुभव विषद केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. माहेश्वरी यांनी संशोधक विद्यार्थ्यांसमोर नवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्ती आणण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. प्रा. एस.टी. इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी स्पर्धेचे समन्वयक प्रा.जे.व्ही. साळी यांनी स्पर्धेचा आढावा सादर केला. सुत्रसंचालन प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी केले. डॉ. व्ही.एम. रोकडे यांनी आभार मानले.
अविष्कार संशोधन स्पर्धेचा विविध गटांतील निकाल पुढील प्रमाणे:-
मानव्य विद्या, भाषा, आणि ललित कला शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : निकीता महाले व गायत्री धनगर (आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पोस्टर द्वितीय : भारती कोळी व योगश्वरी पाटील (कला, विज्ञान व वाणिज्य महा., पाचोरा)
पोस्टर तृतीय : चारूशिला पाटील (एन.टी.व्ही.एस. शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नंदुरबार)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : जितेंद्र भामरे व कौस्तुभ चौधरी (आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटीकल
एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर)
मोड्यूल द्वितीय : दिपाली पाटील व पुजा भोई (शिक्षणशास्त्र विभाग, कबचौउमवि)
पोस्टर तृतीय : खुशी जयस्वाल व दिव्या चौधरी (आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटीकल
एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर)
पदव्युत्तर-पदवी गट :- पोस्टर प्रथम : वृषाली सोळंके (संगणकशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि,जळगाव)
पोस्टर द्वितीय : विलास कुमावत (संरक्षणशास्त्र विभाग, कबचौउमवि, जळगाव)
वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र व विधी शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : रितिका पाटील (एच.आर. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पोस्टर द्वितीय : तेजस्वी बारी व शिखा सिंग (एच.आर. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर) पोस्टर तृतीय : अश्विनी पाटील (आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अॅण्ड
डेव्हलपमेंट, शिरपूर)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : प्रथमेश मुळे (व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव) पोस्टर द्वितीय : आचल गिराई (विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे)
पोस्टर तृतीय : वैदेही शाह व गुंजन जैन (प्रताप महाविद्यालय, अमळनेर)
पदव्युत्तर-पदवी गट :- पोस्टर प्रथम : देवदत्त गोखले (जी.एच.रायसोनी इन्स्टीट्यूट ऑफ इंजि.अॅण्ड बिझनेस मॅनेजमेंट, जळगाव)
पोस्टर द्वितीय : कौस्तुभ सावंत व सपना येशी (व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव)
विज्ञान शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : मृणाल पाटील (एच.आर. पटेल इन्स्टीट्यूट ऑफफार्मा, शिरपूर)
मोड्युल द्वितीय : मानसी ठाकरे व श्रेयस चौधरी (आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पोस्टर तृतीय : तेजस्वीनी पाटील (राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा)
पदव्युत्तर गट :- मोड्युल प्रथम : तन्मय बच्छाव व वैष्णवी बोरसे (जैवशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि,जळगाव)
पोस्टर द्वितीय : हिमानी महाजन (भौतिकशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव)
पोस्टर तृतीय : अक्षीता बारी व कल्याणी भावसार (आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पदव्युत्तर-पदवी गट :- पोस्टर प्रथम : रिया जैन (गणितशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव)
पोस्टर द्वितीय : अरूण काळे (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव)
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानशाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : अथर्व मांढरे व हर्षल बोरसे (रासायनिक तंत्रज्ञान संस्था, कबचौउमवि)
पोस्टर द्वितीय : विश्वेश्वर नन्नवरे (आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पोस्टर तृतीय : हर्षदा पाटील व हिमांशु सोनी (एच.आर.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : उत्कर्ष भामरे (एच.आर.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पोस्टर द्वितीय : मयुर पेंढारकर (रासायनिक तंत्रज्ञान संस्था, कबचौउमवि)
पोस्टर तृतीय : वैशाली जावळे (गणितशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव)
पदव्युत्तर- पदवी गट :- पोस्टर प्रथम : प्रवीण सरोदे ( आर. सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर)
पोस्टर द्वितीय : संदीप सोनवणे ( आर. सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर)
औषधनिर्माण व वैद्यकीय शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : तेजस्विनी शिंदे व यशश्री पाटील (एच.आर.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पोस्टर द्वितीय : दामिनी पाटील व दिपाली जिजाबराव (शरदच्चंद्रीका पाटील फार्मसी महा. चोपडा)
पोस्टर तृतीय : कोमल भावसार (आर.सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : केतकी सोनवणे व ममता सुर्यवंशी(जैवशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव)
पोस्टर द्वितीय : सुनील मोरे व चेतना गांगुर्डे (आर.सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
पोस्टर तृतीय : श्रेया पाटील (एच.आर. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
पदव्युत्तर -पदवी गट :- पोस्टर प्रथम : मतीन शेख (आर.सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
पोस्टर द्वितीय : महेंद्र महाजन (एच.आर. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
कृषी व पशुसंवर्धन शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : दीपवर्धन चौधरी व तेजस पाटील (एच.आर.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
मोड्यूल द्वितीय : इशिका गरूड व कन्हैया गुप्ता (आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
पोस्टर तृतीय : रूही शाह व संकेत निकुंभ (एच.आर.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
पदव्युत्तर गट :- मोड्युल प्रथम : प्रणव तराळ व भावेश महाजन (जी.एच.रायसोनी इन्स्टीट्यूट ऑफ इंजि.अॅण्ड बिझनेस
मॅनेजमेंट, जळगाव)
पोस्टर द्वितीय : सौरभ बोरसे व तेजस सोनवणे (एच.आर.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
पोस्टर तृतीय : शुभांगी देसले व राहुल माळी (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि)
पदव्युत्तर -पदवी गट :- पोस्टर प्रथम : रवींद्र महाजन (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि) पोस्टर द्वितीय : गिरीश चाटे (संगणकशास्त्र प्रशाळा कबचौ उमवि, जळगाव)
शिक्षकेत्तर गट :- प्रथम : हेमंत गायकवाड (बी.पी. कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,चाळीसगाव)
द्वितीय : महेंद्र महाजन (कबचौउमवि, जळगाव)
कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेतील विजेते
मानव्य विद्या, भाषा, आणि ललित कला शाखा : डॉ. नितीन बडगुजर (प्रथम), डॉ. महेश पाटील (द्वितीय),
वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र व विधी शाखा : डॉ. प्रशांत पाटील (प्रथम), डॉ. योगिता चौधरी (द्वितीय)
विज्ञान शाखा : डॉ. वसिम शेख (प्रथम), डॉ. राजेंद्र पाटील (द्वितीय)
कृषी व पशुसंवर्धन शाखा : वंदना चौधरी (प्रथम), डॉ. वर्षा चौधरी (द्वितीय)
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानशाखा : डॉ. उज्वल पाटील व डॉ. तुषार देशपांडे (प्रथम) आणि डॉ. राजकुमार सिरसाम (द्वितीय)
औषधनिर्माण व वैद्यकीय शाखा : डॉ. प्रशांत पाटील (प्रथम) व राहुल महिरे (द्वितीय)