जळगाव मनपा मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या समारोपासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोप साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली जळगाव मनपा प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असून आज दि. 9/8/ 23 रोजी “पंचप्राण शपथ” महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुख व त्यांचे अधिनस्त असलेल्या कर्मचारी वर्गाने मनपा प्रांगणात सकाळी ठीक १०:०० वाजता घेतली.

यावेळी सदरची “पंचप्राण शपथ” ही महापौर जयश्री सुनील महाजन यांनी हातात मातीचा दिवा प्रज्वलित करून घेऊन, त्यांनी त्यांचे समवेत मनपाचे अधिकारी, कर्मचारी वर्गास व सदस्य वर्गास शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे दिली. यावेळी अधिकारी कर्मचारी व सदस्य यांनी हातात मातीचा दिवा प्रज्वलित करून घेऊन “पंचप्राण शपथ” घेतली.

तसेच मनपाच्या सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा विभाग, अग्निशमन विभाग युनिट्स अंतर्गत येत असलेल्या सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी यावेळी “पंचप्राण शपथ” शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे घेतली. यावेळी उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त अश्विनी गायकवाड, उपायुक्त गणेश चाटे, अभिजीत बाविस्कर, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, सदस्य विशाल त्रिपाठी, सदस्य नवनाथ दारकुंडे, LULM विभागाच्या गायत्री पाटील व शालिग्राम लहासे हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.