क्रिकेट विश्वचषकाचे नवीन वेळापत्रक जाहीर… जाणून घ्या कोणता सामना कधी…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

वर्ल्ड कप २०२३ चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचवेळी, भारतीय संघ स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे खेळणार आहे, तर भारताचा पाकिस्तानसोबतचा सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे. या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघ राऊंड रॉबिनच्या आधारे सामने खेळतील आणि अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत खेळतील. विश्वचषक फायनल १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल, उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता येथे खेळले जातील.

 

जाणून घ्या भारताचे सामने कधी आणि कुठे होणार आहेत.

८ ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चेन्नई)

११ ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दिल्ली)

१४ ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान (अहमदाबाद)

१९ ऑक्टोबर भारत विरुद्ध बांगलादेश (पुणे)

२२ ऑक्टोबर भारत विरुद्ध न्यूझीलंड (धर्मशाला)

२९ ऑक्टोबर, भारत विरुद्ध इंग्लंड (लखनौ)

२ नोव्हेंबर भारत विरुद्ध श्रीलंका (मुंबई)

५ नोव्हेंबर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (कोलकाता)

१२ नोव्हेंबर भारत विरुद्ध नेदरलँड्स (बेंगळुरू)

Leave A Reply

Your email address will not be published.