थकीत मालमत्ता करधारकांवर महानगरपालिकेची धडक कारवाई

0

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क 

अनेक वर्षांपासून कर न भरणाऱ्या व अभय शास्ती माफी योजनेचा फायदा न घेणाऱ्या व ज्यांची नावे वर्तमानपत्रात दिलेली आहेत अशा एकूण 480 थकित मालमत्ता करधारकांपैकी 58 जणांचे नळ कनेक्शन मनपा मार्फत बंद करण्यात आले. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत ही धडक कारवाई करण्यात आली.

एकूण 480 थकीत मालमत्ता धारकांपैकी आतापर्यंत 202 जणांनी संपूर्ण कराचा भरणा केलेला आहे. कर न भरणाऱ्या 58 जणांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले आहे. तसेच थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ता कर धारकांवर नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई ही शासकीय सुट्टीचे दिवस असल्यावर सुद्धा शनिवार, रविवार रोजी देखील सुरू राहील.

अभय शास्ती योजनांचे शेवटचे 4 दिवस बाकी आहेत. नागरिकांनी थकीत कर भरून या योजनेचा फायदा घ्यावा. शनिवार, रविवार हे शासकीय सुट्टीचे दिवस असून देखील प्रभाग समितीची सर्व कार्यालय पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. तरी या योजनेचा जास्तीत जास्त मालमत्ता करधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी  केलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.