जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जनजागृती अभियानावर भर…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे असून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी बुथ निहाय जनजागृती समूह स्थापन करावेत अशा सूचना उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री महेश सुधळकर व नोडल अधिकारी तथा उपायुक्त अश्विनी गायकवाड यांनी स्वीप (Systematic voter education electral participation program) संदर्भात घेतलेल्या बैठकीत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बूथ निहाय जनजागृती समूह स्थापन करायचे आहेत. भूतस्तरीय शासकीय यंत्रणा स्थानिक संस्था प्रतिनिधी बुथ स्तरीय प्रतिनिधी बुथ स्वयंसेवक, बूथ भागातील शाळा, एन एस एस, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक तसेच सामाजिक संस्थांचे स्वयंसेवकांचा सहभाग या जनजागृती समूहामध्ये आवश्यक आहे. या समूहाच्या माध्यमातून नैतिक मार्गाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करणे, चौकसभा रॅली चर्चासत्र घेणे ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे हा उद्देश समोर ठेवून मतदाना विषयक ज्यांना जागृती वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. दिनांक 22 मार्च रोजी जळगाव शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या या प्राथमिक बैठकीत 358 बी एल ओ, 36 पर्यवेक्षक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.