ब्रेकिंग ! जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी आ. मंगेश चव्हाण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. जिल्हा दूध संघाच्या चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत आज सकाळी अधिकृत घोषणा करण्यात आली.

जिल्हा दूध निवडणूक झाल्यानंतर संघाची चेअरमनपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नूतन संचालकांची बैठक झाली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. रात्री उशिरा ११ वाजेपर्यंत ही बैठक चालली.

दूध संघात भाजप- शिंदे गटाला स्पष्ट बहुमत असल्याने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी अंतिम निर्णय घेत संचालक मंडळाच्या बैठकीतही आ. मंगेश चव्हाण यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.

आमदार मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे आमदार असले तरी त्यांनी खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये निवडणूक लढवून खडसेंच्या धर्मपत्नींचा पराभव केला. त्यामुळे शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आ. मंगेश चव्हाण हे हिरो ठरले.

Leave A Reply

Your email address will not be published.