Monday, January 30, 2023

जळगावात दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, दोघे गंभीर जखमी

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव (Jalgaon) शहरातील ममुराबाद रोडवर (Mamurabad Road) असलेल्या जोगेश्वरी माता मंदिराजवळ भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात (Accident) देविदास दशरथ पाटील (५६, रा. ममुराबाद) यांचा जागीच मृत्यू झाला तर धडक देणारे दुचाकीस्वार मयुर डिगंबर डांगे (२३) आणि ऋषी आबा महाले (२१, दोघे रा. रामेश्वर कॉलनी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

मयत देविदास पाटील हे जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. ते जळगाव शहरातील दाणाबाजारमध्ये हातमजुरी करायचे. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते (एमएच. १९. डीजे. ३६०९) दुचाकीने ममुराबादकडे जात होते. तर मयुर डांगे व त्याचा मित्र ऋषी महाले हे (एमएच. १९. डीएक्स.४१११) दुचाकीने ममुराबाद येथून हळदीच्या कार्यक्रमातून जळगावकडे भरधाव वेगाने येत होते. दरम्यान यावेळी दोघा दुचाकींची समोरासमोर धडक होवून अपघात झाला. या अपघातात देविदास पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे