मालकाला ४४ लाखात गंडवले; कामगारावर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील एमआयडीसी येथील विजय ॲग्रो सेंटर या कंपनी मालकाला कंपनीतील गोडावून किपर कामगाराने तब्बल ४४ लाख ७३ हजार ६२८ रुपयात फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कामगारावर गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील निसर्ग कॉलनी येथील रहिवासी नितीन जगदीश कुलकर्णी (वय ४२) यांची एमआयडीसी येथील ३२ एक्स सेक्टरमध्ये विजय ॲग्रो सेंटर नावाने कंपनी आहे. कंपनीतील गोडावून किपर पंकज नितीन पाटील रा. जगवानी नगर, जळगाव याने जून २०२१ ते २९ एप्रिल २०२२ दरम्यान कंपनीचे बनावट फॉर्म तयार करुन ४४ लाख, ७३ हजार, ६२८ रुपये किंमतीच्या विविध विद्राव्य खते, बियाणे तसेच किटकनाशके या मालाचा अपहार केला.

सदर प्रकार समोर आल्यानंतर कंपनी मालक नितीन कुळकर्णी यांनी पंकज नितीन पाटील यांच्या विरोधात सोमवार १ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गिरासे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.