वृद्ध शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

1

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

तालुक्यातील शिंदाड येथील एका ६० वर्षीय वृद्धाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटना दि. २ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिंदाड ता. पाचोरा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व समाज विकास शिक्षण मंडळाचे संचालक दयाराम नारायण चौधरी (वय ६०) यांनी दि. २ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गावातीलच उत्तम महादु चौधरी यांच्या शेतातील झाडाला गळफास लावत आपली जीवनयात्रा संपवली.

दयाराम चौधरी यांना ग्रामस्थांनी पाचोरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. मयत दयाराम चौधरी यांच्या पश्चात्य पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दयाराम चौधरी यांच्या आत्महत्येमागील कारण समजु शकले नाही. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

1 Comment
  1. विठ्ठल पवार राजे says

    अत्यंत दुर्दैवी घटना आहे तयारी चौधरी यांनी ची आत्महत्या केलेली आहे ते आत्महत्या पाठीमागचे कारण कुटुंबातील लोकांनी तत्काळ कळवावे म्हणजे शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना पुढील कामकाज करता येईल. व
    कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली किंवा कसे कळवावे
    कुटुंबातील लोकांना काही मदत किंवा शासनाचे काही आर्थिक सहाय्य काय आहे का.

Leave A Reply

Your email address will not be published.