राज्यात पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पाऊस

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

हवामान विभागाकडून ऑगस्ट महिन्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढचे ३ ते ४ दिवस राज्यातील (Maharashtra Rain Alert) काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा इशारा आहे.

अमरावती, भंडारदरा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ४ आणि ५ ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदाबाद, पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोकण, मध्यमहाराष्ट्र, विदर्भात पावसाने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली.

दरम्यान हवामान विभागाकडून या आणि पुढच्या महिन्याच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दोन्ही महिन्यात समाधान सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, कोकणात सर्वसाधारण, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर सरासरीपेक्षा जास्त राहील, राहणार आहे.

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन महिन्यांत देशभरात सामान्य पाऊस पडेल. ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता असून पश्चिम मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य, पूर्वेत्तर भारतात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतीय राज्यात मात्र उर्वरित राज्यापेक्षा अतिवृष्टी होईल. कोकणासकह कोल्हापूरला (३, ४ ऑगस्ट) यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पंजाबराव डख यांचा अंदाज

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते या दोन महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बघायला मिळणार आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनीही वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, २ व ३ ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, परभणी, बीड, नांदेड तसेच विदर्भातील यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.