मनिषा किशोर पाटील यांना खान्देश प्रेरणा पुरस्कार प्रदान

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्षा तसेच नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव व जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनीच्या अध्यक्षा मनिषा किशोर पाटील यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्यामुळे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगावतर्फे खान्देश प्रेरणा पुरस्कार २०२२ त्यांच्या सामाजिक कार्यासाठी कुणाल मोरे जिल्हा संपर्क प्रमुख महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगाव तर्फे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी आमदार राजू मामा भोळे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, रेणुका हिंगु, हर्षाली पाटील उपस्थित होते. त्यांचे सामजिक कार्य स्तुत्य असून समाजातील गरजू व वंचित तसेच दिव्यांग यांच्यासाठी त्या नेहमी विशेष उपक्रम राबवित असतात. यापूर्वी देखील त्यांना अनेक सामजिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांचे या पुरस्कारासाठी सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.