संजय राऊतांशी संबंधित 2 ठिकाणी ED ची धाड

0

मुंबई,  लोकशाही न्यूज नेटवर्क 

संजय राऊत (Sanjay Raut) प्रकरणामध्ये ईडीने (ED Inquiry) मुंबईत (Mumbai) दोन ठिकाणी छापेमारी केली आहे. पत्राचाळ प्रकरणात (Patra Chawl Case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी ईडीने आज मुंबईत दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.

आज सकाळी ईडीच्या टीमने तीन ठिकाणी छापे टाकले आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीने दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहे. दादर आणि कांजूरमार्ग या दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. या धाडी राऊत यांच्या घरी टाकल्या आहेत का ही माहिती अजून मिळू शकली नाही. मात्र, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी केली होती.

या चौकशीतून काही माहिती समोर आली होती. त्यानुसार दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पत्राचाळ प्रकरणात काही बैठक झाल्या होत्या, काही कागदपत्र हाती घ्यायची आहे. त्यानुसार ही कारवाई केली आहे. याबद्दल संध्याकाळी ईडी खुलासा करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.