धक्कादायक.. जिल्हा कारागृहातील कैद्याकडे सापडला मोबाईल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हा कारागृहातून (jalgaon district jail) एक खळबळजनक वृत्त समोर आहे. कारागृहात एका कैद्याकडे मोबाईल आढळून आला असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा कारागृहाच्या पाठीमागील भींतीवरून एका अज्ञात व्यक्तीने बुधवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास मोबाईल जिल्हा कारागृहाच्या कोवीड बँरेक व १२ नंब बँरेक मधील भागात फेकला. फेकलेला मोबाईल न्यायालयीन कैद असलेला प्रशांत अशोक वाघ याने उचलला. कैदी प्रशांत वाघ याने १८ नोव्हेंबर रोजी एरंडोल शहराच्या पुढे भालगाव फाटा येथे जवानाला चाकूचा धाक दाखवून लुटून नेणाऱ्या चार दरोडेखोरांपैकी एक दरोडेखोर आहे.

दरम्यान मोबाईल कैदी प्रशांत वाघ यांच्याकडे आढळून आल्याने जेल पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाईल हस्तगत केला आहे. जेल शिपाई बुढन भिकन तडवी (वय ३७, रा. जळगाव जिल्हा कारागृह) यांच्या फिर्यादीवरून कैदी प्रशांत अशोक वाघ यांच्यासह अज्ञात व्यक्तीविरोधात न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक जयंत कुमावत करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.