रशिया-युक्रेन युद्धाचा शेअर मार्केटला मोठा फटका ! ७ लाख कोटी बुडाले

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

रशिया-युक्रेन युद्धाची घोषणा करण्यात आलीय. याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याने मोठी पडझड पाहायला मिळाली. पहिल्याच मिनिटांत मुबंईचा शेअर बाजार २००० अंकानी पडला आणि ५५,६८३ अंशांवर पोहचला. या युद्धाचा सर्वाधिक फटका बँकिंग शेअर्सना बसला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

बँकिंग शेअर्सप्रमाणेच टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो, एचडीएफसी, एसबीआय, महिंद्रा एंड महिंद्रा, बजाज फिनवर्स, इन्फोसिस, एक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती, डॉ. रेड्डीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसीचे शेअर्स २ ते ३ टक्क्यांनी घसरले आहेत.

सेन्सेक्समध्ये ७६ शेअर्स अपर सर्किटमध्ये तर ५७८ लोअर सर्किटमध्ये आहेत. म्हणजे या ५७८ शेअर्समध्ये आज सद्य किमतीपेक्षा कमी वा जास्त् किंमत होऊ शकणार नाहीत. लिस्टेड कंपनींपैकी २३७८ शेअर्समध्ये घसरण आहे. तर २७० शेअर्समध्ये वाढ आहे. दुसरीकडे निफ्टीतही ४७६ अंशांची घसरण पाहायला मिळाली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध आणि क्रूड तेलाचे वाढते भाव यामुळे अनेक जण बाजारातून पैसे काढून घेण्याच्या मनस्थितीत आहेत. युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल १०० डॉलर्सवर पोहचले आहेत. हे गेल्या ८ वर्षांतील सर्वाधिक दर आहेत. हे दर १२० डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर २० रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे रुपयातही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. रुपया ५५ पैशांनी कोसळून ७५.१६ रुपये प्रति डॉलरवर जाऊन पोहचला आहे.
या सगळ्यात सोने ५२ हजारांवर पोहचले आहे. चांदीच्या भावातही तेजी आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.