अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करून विनयभंग; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरात राहणाऱ्या एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.  याप्रकरणी शुक्रवारी रात्री ११ वाजता एकावर पोक्सो कायद्यांतर्गत  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भागात वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणाऱ्या एकाने शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता पिडीत मुलीसोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या पिडीत मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला.

दरम्यान पिडीत मुलीसह तिचे नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता संशयित आरोपीच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.