बुलढाणा हादरले; फोन वर बोलल्याच्या कारणावरून अपंग तरुणाची हत्या

0

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क

बहिणीसोबत फोनवर बोलल्याच्या कारणावरून एका अपंग तरुणाचा मारहाण करीत जीव घेण्यात आला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील चावर येथे ही घटना घडली आहे. आकाश गोकुळ सोळंके असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाशच्या वडिलांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघं आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे गावात एकाच खळबळ उडाली आहे. अर्जुन गजानन सोनोनो आणि राजेश गुरुदेव सोनोने अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. आरोपींविरोधात कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
आकाश हा आरोपीच्या बहिणीसोबत फोनवर बोलायचं. हे आरोपीला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आकाशच्या घरात घुसून त्याला माझ्या बहिणीशी फोनवर का बोलला असं जाब विचारत आरोपी आणि त्याच्या साथीदाराने आकाशला बेदम मारहाण केली. आकाशाचे आई-वडील हे शेतात कामासाठी गेले होते. संध्याकाळी शेताचे काम आटपून घरी आले असता, त्यांना त्यांचा अपंग मुलगा जखमी अवस्थेत घरात पडलेला दिसला. त्याच्या तोंडातून रक्त निघत होते. तसेच त्याच्या संपूर्ण शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. आकाशची तब्येत जास्त खालावल्याने त्याच्या पालकांनी त्याला जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु मारहाणीमुळे अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.