जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच, एक जण जागीच ठार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात अनेक अपघात होत असून, अपघातांचे प्रमाण देखील सातत्याने वाढत आहेत. आज पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील काही तरुण चारचाकी व दुचाकी वाहनाने जात असतांना भीषण अपघात घडला.

सूत्रांनुसार, पाचोरा तालुक्यातील पुंनगाव येथील तिघेजण शिरसाळा मारुती मंदिरात दर्शनासाठी जात असतांना हा अपघात झाला. जामनेर शहराजवळील भवानी घाटात बोदवडकडून ४ चाकी वाहन जामनेरकडे जात होते तर, जामनेरकडून बोदवडकडे तरुण दुचाकीवरून जात असताना, दोघा वाहनांनी समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात अर्जुन सुकलाल जाधव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर, अर्जुन जाधव सुरवाडे व तुषार संतोष जामदार रा. पुंगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन नाल्यात जावून पडल्याने कारमधील गीतांजली सुहास बांगर, वंदना माधव दांभोरे, प्राजक्ता विठ्ठल आसुदे रा. छत्रपती संभाजीनगर हे जखमी झाले. जखमींवर जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून, त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.