घोर कलियुग ! दानपेटीत सापडला 100 कोटींचा चेक, खात्यात फक्त ..

0

आंध्रप्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जगात घोर कलियुग वाढले असून लोकं आता देवाला सुद्धा घाबरत नाहीय.. अशीच एक घटना आंधरप्रदेशातून समोर आली आहे. शहरातील सिंहाचलम टेकडीवर स्थित, श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हे आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या  मंदिरात एका भक्ताने 100 कोटी रुपयांचा धनादेश मंदिराच्या दानपेटीत जमा केला आहे. दरम्यान मंदिर प्रशासनाने धनादेश संबंधित बँकेला पाठवला असता, भक्ताच्या खात्यात केवळ 17 रुपये असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. या धनादेशाचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतेय.

 

कोटक महिंद्रा बँकेच्या चेकवर भक्ताने तारीख लिहिलेली नाही. धनादेशावरून असे दिसून आले आहे की भक्त हा बँकेच्या विशाखापट्टणम येथील शाखेत खातेदार आहे. मंदिराच्या अधिकाऱ्यांना हुंडीत धनादेश मिळाल्यावर त्यांनी तो कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नेला. त्याला काहीतरी गैर वाटले आणि तो 100 कोटी रुपयांचा धनादेश आहे की नाही हे संबंधित बँकेच्या शाखेत तपासायला सांगितले. दरम्यान ज्या व्यक्तीने चेक जारी केला त्याच्या खात्यात फक्त 17 रुपये असल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी मंदिर संस्थेला दिली. देणगीदाराची ओळख पटवण्यासाठी मंदिराचे अधिकारी बँकेला पत्र लिहिण्याचा विचार करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.