धक्कादायक; तरुणाला चक्क झाडाला बांधून केले ‘हे’ कृत्य, वाचा सविस्तर

0

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली असून, एका तरुणाला चक्क झाडाला बांधून त्याच्यासोबत अमानुष कृत्य करण्यात आले आहे. शेळी चोरीच्या संशयावरून ही घटना घडली असून, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे ही घटना घडली आहे.

अधिक माहितीनुसार, शेळी आणि कबुतर चोरल्याचा संशय या दलित तरुणांवर होता. त्यांनतर त्यांना घरातून उचलून नेत झाडाला उलटं लटकावून त्यांच्यासोबत अमानुष कृत्य करण्यात आल्याची माहिती पीडितांच्या कुटुंबियांनी दिली आहे. मारहाणीमध्ये शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड आणि खंडागळे हे तरुण जबर जखमी झाले आहेत. त्यांना शिरपूर येथील हॉस्पिटल मध्ये दाखल कारण्यात आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी दलित संघटनांनी आवाज उठवायला सुरुवात केली असून, आरोपींचा तपास पोलिस घेत आहेत. तर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये तरुणांना झाडाला उलटं लटकावलेलं दिसत आहे. या घटनेनंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.