Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कारवाई केल्याचा राग, ठाणे अंमलदाराला शिवीगाळ
    जळगाव

    कारवाई केल्याचा राग, ठाणे अंमलदाराला शिवीगाळ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 22, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    कारवाई केल्याचा राग आल्यामुळे जळगाव शहरातील पोलीस ठाण्यात येवून एकाने ठाणे अंमलदाराला शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

    जळगाव शहर पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल संजय श्रीधर झाल्टे यांनी विलास हेमलाल सोनवणे (रा. वाल्मिक नगर, जळगाव) याच्याविरुद्ध सीआरपीसी १०७ प्रमाणे कारवाई केली होती. त्याचा राग आल्याने विलास सोनवणे याने बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता शहर पोलिस ठाण्यात येवून पोलीस हेड कॉन्स्टेबल झाल्टे यांना दमदाटी केली. तसेच तुला जास्त झालेले आहे. यापुर्वी मी तुझ्यावर केलेले खोटे अर्ज व तुझ्याकडे तपासावर असलेल्या अदखलपात्र फिर्यादीत तुला त्रास व्हावा याकरीता माहीती अधिकार मागितले होते. तरी तुझी जिरलेली नाही. आता मी पुन्हा तुझ्यावरती वरिष्ठांकडे अर्ज व तक्रारी करेल. तू नोकरी कशी करतो?, तुला नोकरी करु देणार नाही आणि तुझी नोकरी कशी खातो तू पहाच, असे बोलून शिवीगाळ केली. याप्रकरणी संजय झाल्टे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार उल्हास चऱ्हाटे हे करीत आहेत.

     

    crime news jalgaon Jalgaon City Police Station
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif