पौष्टिक बीटरूट ज्यूस प्या आणि आजार दूर पळवा

0

लोकारोग्य विशेष

सकस आहार आणि ताजी फळे खाल्याने आपले आरोग्य चांगले राहते. आज आपण बीटरूटच्या ज्यूसचे फायदे जाणून घेणार आहोत. बीटरूटचा ज्यूस खूप पौष्टिक असतो. हिवाळ्यात बीटरूट ज्यूस पिल्याने अनेक फायदे आहेत. यामुळे शरीरातील आजार दूर राहतात. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यासारखे पोषक घटक मधुमेह, हृदय आणि अॅनिमियासारख्या आजारांवर फायदेशीर आहेत. बीटचा रस पिण्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होतो. बीटमुळे हृदयाच्या मांसपेशीही मजबूत होण्यास मदत होते. बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फॉलिक ऍसिड असते त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते

असा बनवा बीटचा ज्यूस

२-३ बीट, लिंबाचा रस, काळे मीठ

बीटरूटचा रस तयार करण्यासाठी बीट चांगले धुवा, सोलून घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा. बीटरूटचे तुकडे मिक्सरच्या जारमध्ये टाका. त्यात काळे मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. आता बीटरूटचा रस गाळून घ्या. या ज्यूसच्या सेवनाने अनेक आजार बरे होतात.

रक्त वाढण्यासाठी
बीटरूटच्या रसामध्ये भरपूर पोषक असतात. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. अ‍ॅनिमियासारख्या आजारात बीटरूट फायदेशीर आहे. हिवाळ्यात बीटरूटचा रस प्यायल्याने आजार दूर राहतात.

हृदयासाठी फायदेशीर
बीटरूटचा रस हृदयासाठीही फायदेशीर मानला जातो. हिवाळ्यात बीटरूटचा रस प्यायल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो. यामध्ये व्हिटॅमिन बी आणि अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचे काम करतात.

त्वचेसाठी फायदेशीर
बीटरूटचा रस त्वचेसाठीही फायदेशीर आहे. हा रस प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. रक्त शुद्ध झाल्यावर त्वचेच्या पेशी चमकतात. बीटरूटचा रस प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात आणि चेहरा चमकदार होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.