प्रतापनगर येथील स्वामी समर्थ केंद्रात पितृ तर्पण सेवेचे आयोजन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील प्रतापनगरच्या स्वामी समर्थ केंद्रात दि. २३ डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या आरतीनंतर आमावस्येनिमित्त पितृ तर्पण सेवा घेण्यात येणार आहे. ज्या सेवेकऱ्यांना या तर्पणात सहभागी व्हायचे असेल त्यांनी पळी, चमचा, ताटली, फुलपात्र, छोटा प्याला, काळी तीळ, उपरणे किंवा रुमाल या वस्तू सोबत आणाव्या. तसेच सायंकाळी साडेचार वाजता बटुक भैरव हवन युक्त होणार आहे. या सेवेत जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.