भारतीयांना झटका ! 37 लाख WhatsApp अकाउंट्स बॅन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

WhatsApp हे सर्वात जास्त वापरले जाणारे माध्यम आहे. WhatsApp ने नोव्हेंबरमध्ये भारतात 37.16 लाख अकाउंट्सवर बंद केले आहेत. यामधील 9 लाख 90 हजार असे अकाउंट्स आहेत, ज्यांच्यावर कोणत्याही युजर्सने रिपोर्ट करण्याआधीच कारवाई करण्यात आली आहे. मागील महिन्यात बंदी घालण्यात आलेल्या खात्यांपेक्षा जवळपास 60 टक्के जास्त आहे.

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने नवीन आयटी नियम 2021 चे पालन करून या अकाउंट्सवर बंद केले आहे. व्हॉट्सअॅपने ऑक्टोबर महिन्यात देशातील 23.24 लाख अकाउंट्सवर बंदी घातली होती. त्यापैकी 8.11 लाख अकाउंट्सवर सक्रियपणे बंदी घालण्यात आली होती. Whats App ने माहिती तंत्रज्ञान नियम 2021 अंतर्गत भारतासाठी प्रकाशित केलेल्या नोव्हेंबरच्या मासिक अहवालात म्हटले आहे की, 1 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 दरम्यान 37,16,000 WhatsApp खात्यांवर बंदी घालण्यात आली होती.

यापैकी 9.9 लाख खाती वापरकर्त्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वी सक्रियपणे बॅन करण्यात आली होती. +91 फोन नंबरद्वारे भारतीय खाते ओळखले जाते. देशातील 40 कोटी युजर्स असलेल्या WhatsApp ला नोव्हेंबरमध्ये 946 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 830 तक्रारींमध्ये खातेदारावर बंदी घालण्याच्या तक्रारींचा समावेश आहे. त्यापैकी केवळ 73 खात्यांवर कारवाई करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.