दुकान फोडून दीड लाखांचे स्पेअर पार्ट लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगावातील नवीन बी. जे. मार्केटमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून नऊ हजार रुपये आणि दीड लाखांचे स्पेअर पार्ट लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा आहेत.

गुरुनानक ट्रेडर्स  हे दुकान प्रदीप नानकराम रामचंदानी (वय ४०, रा. कंवरनगर, जळगाव) यांच्या मालकीचे आहे. दि. २१ ऑक्टोबर रोजी रात्री या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी नऊ हजार रुपये रोख व दीड लाखांचे सबमर्सिबल पार्टस लांबवले आहेत. प्रदीप रामचंदानी यांनी अहमदाबाद, राजकोट, भडगाव व खेडी येथून आणलेले कॉपरसह गन मेटल बुश आदी साहित्य आणले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.