Wednesday, February 1, 2023

आधी ग्रहण व्हॉट्सऍपला; मग सूर्याला… युजर्सचे मात्र हाल…

- Advertisement -

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आज सूर्याला ग्रहण (eclipse of the sun) लागणार आहे. मात्र त्यापूर्वीच आज दुपारी 1 च्या सुमारास व्हॉट्सऍपची सेवा भारतासह अनेक देशांमध्ये अचानक खंडित झाली, (WhatsApp service was suddenly interrupted in many countries including India) त्यामुळे ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, अचानक सर्व्हर डाउन झाल्यामुळे वापरकर्ते ना मेसेज पाठवू शकत ना रिसिव्ह करू शकत आहेत. व्हॉट्सऍपच्या इतिहासात याआधी कधीच इतकी वेळ सेवा खंडित झाली नव्हती.

- Advertisement -

व्हॉट्सऍप व्यतिरिक्त, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या मालकीच्या कंपनी मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्ही शक्य तितक्या लवकर सेवा पुनर्संचयित करण्यासाठी काम करत आहोत. आम्हाला माहित आहे की काही लोकांना सध्या संदेश पाठवण्यात समस्या येत आहेत.

दरम्यान, जगभरातील लोक सोशल मीडियावर व्हॉट्सऍपचे मीम्सही बनवत आहेत. याद्वारे लोक विविध प्रकारे व्हॉट्सऍपची खिल्ली उडवत आहेत. हे सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड करत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे