भंगार व्यावसायिकाला १२ लाखांत गंडवले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील मेहरुण भागात राहणाऱ्या भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाची दोन जणांनी तब्बल ११ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवार ६ ऑगस्ट रोजी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल जब्बार कादर पटेल (वय ५७, रा. गुलाब बाबा कॉलनी, मेहरूण, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. अब्दुल पटेल व त्यांचा भागिदार तानाजी शिंगाडे यांनी मिळून भंगार खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय आहे. संतोष गुलाब खुडे आणि चंदू जाधव (पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. कासेवाडी, भवानीपेठ, स्वारगेट, पुणे यांनी अब्दुल पटेल व तानाजी शिंगाडे यांच्याकडून ११ लाख ९० हजार रुपये  घेऊन भंगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी भंगार न देता त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी अब्दुल पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शनिवार ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी संतोष गुलाब खुडे व चंदू जाधव यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.