रोटरी इंटरॅक्ट क्लबतर्फे नंदिनीबाई शाळेत चित्रकला व नाटकावर मार्गदर्शन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व जुनिअर कॉलेज जळगाव (Nandinibai wamanrao mulinche vidyalaya and junior college,jalgaon) येथे रोटरी इंटरॅक्ट क्लब (Rotary Interact Club) तर्फे चित्रकला (Painting) व नाटक (Drama) याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला विद्यालयाच्या प्राचार्या सी. एस. पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश वेद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  कार्यक्रमाला रोटरी क्लबचे मेंबर सुबोध सराफ यांनी विद्यार्थिनींना नाटक व चित्रकला याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शुभदा कुलकर्णी, रोटरी इंटरॅक्ट कमिटीचेअरमन पंकज व्यवहारे कार्यक्रमाला उपस्थित होते.

इंटरॅक्ट क्लबची अध्यक्ष समीक्षा राजेंद्र पाटील हिने सूत्रसंचालन केले. निकिता पाटील हिने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेमाडे मॅडम व पवार सर यांनी सहकार्य केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.