Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक: अल्पवयीन मुलीचे लग्न,अत्याचारातून मुलीला दिला जन्म
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक: अल्पवयीन मुलीचे लग्न,अत्याचारातून मुलीला दिला जन्म

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 28, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथून धक्कादायक घटना उघडकीस आलीय. येथील रहिवासी मुलगी ही अल्पवयीन असतांना तिच्या आईवडीलांनी लग्न लावून दिले. त्यातच पतीकडून झालेल्या अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिल्याचा खळबळजनक प्रकार बुधवार २७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि आईवडीलांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी राहते. ती अल्पवयीन आहे हे माहित असतांना तिच्या आईवडीलांनी तिचे लग्न उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील एका तरूणाशी लावून दिले. हे लग्न ऑगस्ट २०२२ मध्ये झाले. तिच्या पतीने ती अल्पवयीन असतांना तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीतेने मुलीला जन्म दिला.

    दरम्यान सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासरे आणि आईवडीलांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी २७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  पुढील तपास सपोनि दयानंद सरवदे हे करीत आहे.

    crime news jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif