बँकेत तरुणीचा व्हिडीओ काढणाऱ्याला नागरिकांकडून चोप

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील एका बँकेत काम करणाऱ्या कर्मचारी तरुणीचा लपून व्हिडीओ काढणाऱ्या एका जणाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केलं आहे. शौकत अली अब्दुल गफ्फार (वय 42, रा. कासमवाडी) असं व्हिडीओ काढणाऱ्या संशयित व्यक्तीचं नाव असून त्याच्याविरोधात पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

जळगाव शहरातील रहिवासी असलेली तरुणी एका खासगी बँकेत नोकरीला आहे. 6 सप्टेंबर बुधवारी रोजी दुपारच्या सुमारास शौकत अली नामक व्यक्ती बँकेत आला.  त्याने कर्मचारी तरुणीशी बोलता बोलता तरुणीचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार कर्मचारी तरुणीच्या लक्षात आल्यावर तिने आरडाओरड  केली. घटनेनंतर नागरिकांनी शौकत अली यास पकडून चांगलाच चोप देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी कर्मचारी तरुणीच्या तक्रारीवरुन शौकत अली विरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.