स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती महानगरपालिका देशात प्रथम

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

संपूर्ण भारतामध्ये (नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम ) अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत, सन 2023-24 मधील Best परफॉरर्मिंग सिटीज अंतर्गत सीपीसीबीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारत सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयामार्फत, तीन लाख ते दहा लाख लोकसंख्येच्या कॅटेगरी मधील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अमरावती महानगरपालिकेस जाहीर झाले आहे.

याबाबतचे पत्र रवीन्‍द्र कुमार तिवारी, आ आर एस उप सचिव, पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून प्राप्त झाले आहे. अमरावती महानगरपालिका मार्फत नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत आत्तापर्यंत केलेल्या कामगिरीचा परिणाम असून, या बक्षिसाचे वितरण दिनांक 07 सप्‍टेंबर 2023 रोजी मंत्री पर्यावरण, वन व वातारवरणीय बदल आणि मुख्‍यमंत्री मध्य प्रदेश, यांच्‍या हस्‍ते ‘स्‍वच्‍छ वायु दिवस 2023’ दि. 07 सप्‍टेंबर, 2023 रोजी भोपाल येथे प्रदान करण्यात येणार आहे.

या बक्षिसामुळे अर्थातच महानगरपालिका अमरावती कडून भविष्यात पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने आणखी चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच स्वच्छ वायू दिवस 2023 अंतर्गत अमरावती महानगरपालिकेने 194 गुण प्राप्त करून भारतातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आयुक्त देविदास पवार यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे अमरावती महानगरपालिकेला मोठे यश प्राप्त झाले आहे.

या स्वच्छ वायु स्पर्धेत अमरावती महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याबद्दल महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व अमरावतीकरांचे स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.