जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने वार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जून्या वादातून तरुणावर तिघांनी धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी कांचननगर परिसरात घडली. चिकन घेण्यासाठी जात असलेल्या पवन अशोक कोळी (वय ३०, रा. डीएनसी कॉलेजवळ, जळगाव) या तरुणावर वार करण्यात आला आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

जळगाव  शहरातील डीएनसी महाविद्यालयाजवळ पवन अशोक कोळी हा आपल्या कुटुंबियांसह राहतो. रविवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पवन कांचनगर परिसरात चिकन घेण्यासाठी दुचाकीने जात होता. याचवेळी तीन तरुणांनी त्याच्यासोबत वाद घालून त्याला मारहाण केली. या वादातून  हाणामारी होवून तिघांपैकी एकाने पवनवर धारदार शस्त्राने वार केले.

दरम्यान यामध्ये पवन गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यानंतर पवनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.