५० हजारांची लाच मागितली, जिल्हा आरोग्य अधिका-यावर गुन्हा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिका-याने पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालिन जि.प. जिल्हा आरोग्य अधिका-याचे नाव डॉ. देवराम किसन लांडे आहे. डॉ. देवराम लांडे हे सध्या पाचोरा येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. देवराम लांडे यांनी 22 जून 2023 रोजी  तक्रारदारास पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी भाड्याने देण्याबाबत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव येथे अर्ज सादर केला होता. तक्रारदार यांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेवून त्यांना नियमित भाडे सुरू करण्यासाठी डॉ. देवराम लांडे यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी केली होती. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे लाचलुचपत विभागाचे पोलिस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि रूपाली खांडवी, पोहवा राजन कदम, शरद कटके, पोशि संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील चालक पोहवा सुधीर मोरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.