अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्याचा प्रयत्न, एकास अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव (Jalgaon) शहरातून संतापजनक घटना समोर आली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात (Shanipeth Police Station) हद्दीत राहणाऱ्या ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर एका प्रौढाकडून अनैसर्गीक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ वर्षीय अल्पवयीन मुलगा आपल्या परिवारासह राहतो. रविवार १ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खेळत असतांना त्याच भागात राहणारा शाम गोपाल वर्मा (वय ४५) या प्रौढाने त्याला पतंग उडविण्यासाठी मांजाची चक्री देण्याचे आमिष देत अल्पवयीन मुलाला घरात बोलावून त्याच्या सोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान हा प्रकार अल्पवयीन मुलाच्या घरच्यांच्या लक्षात आला. पीडीत अल्पवयीन मुलाच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री १० वाजता संशयित आरोपी शाम गोपाल वर्मा याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रीया दातीर ह्या करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.