सूर्यनगरी एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले

0

जोधपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

राजस्थानमध्ये (Rajasthan) मोठा रेल्वे अपघात (Train Accident) झाल्याची बातमी आहे. जोधपूरहून वांद्रे टर्मिनसला येणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेसचे 8 डबे रेल्वे रुळावरून (Suryanagari Train Accident) घसरले आहेत. ही दुर्घटना पालीच्या रजकियावास येथे झाला. या दुर्घटनेत दहा लोक जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच रेल्वेचंही कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती मिळाली आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

आज पहाटे 3.27 वाजता रजकियावास-बोमदरा सेक्शनच्या दरम्यान हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रवाशांना मदत पोहोचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी एक ट्रेन रवाना केली आहे, अशी माहिती उत्तर पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत हा मार्ग ब्लॉक करण्यात आला असून चार एक्सप्रेसचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

रेल्वेकडून हेल्पलाइन नंबर जारी

जोधपूर: 0291- 2654979(1072), 0291- 2654993(1072), 0291- 2624125, 0291- 2431646

पाली मारवाड: 0293- 2250324, 0293- 2250138, 0293- 2251072

 

Leave A Reply

Your email address will not be published.