Sunday, January 29, 2023

बदनामीकारक व्हिडीओ टाकून तरुणीचा विनयभंग

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणीचा बदनामीकारक फोटो टाकून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मास्टर कॉलनीत २१ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियासह राहते. तरूणी सध्या शिक्षण घेत आहे. जामनेर शहरात राहणारा मोहम्मद आकीब शेख मोहम्मद रफीक रा. जुना बोदवड रोड, जामनेर, जळगाव याने १४ ऑगस्ट आए १५ ऑगस्ट दरम्यान तरूणीच्या मोबाईल क्रमांकावर बदनामीकारक स्टेटस आणि व्हिडीओ पाठवून तिची बदनामी केल्याचा प्रकार घडला.

- Advertisement -

दरम्यान हा सर्व प्रकार तरुणी नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार तरूणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मोहम्मद आकीब शेख मोहम्मद रफीक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे