अहिराणी बोलीभाषा साहित्य संमेलनाचे संस्थापक प्रवर्तक प्रा.वसंत चव्हाण यांचे निधन…

1

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

पहिल्या व्यासपीठ अखिल भारतीय अहिराणी बोलीभाषा साहित्य संमेलनाचे संस्थापक प्रवर्तक प्रा.वसंत मनोहर चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रा.वसंत चव्हाण हे जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांनी खानदेशातील बोलीभाषा अहिराणीचा प्रथम जागर 1998 रोजी सुरू केला. अमळनेर तालुक्यातील मांडळ या गावी प्रथम अखिल भारतीय अहिराणी बोलीभाषा प्रत्यक्ष व्यासपीठ संमेलनाची मुहर्तमेढ रोवली. या संमेलनाचे उद्घाटक कविवर्य ना.धो. महानोर होते तर अध्यक्ष प्राध्यापक राजा महाजन होते. अहिराणी बोलीभाषा खान्देशी संस्कृतीचा मानबिंदू आहे. तिचं साहित्य भंडार खूप मोठ आहे तिचा प्रचार प्रसार व्हावा जतन व संवर्धन व्हावं म्हणून अहिराणी बोलीभाषेचा जागर सुरू केला.

जळगाव येथे झालेल्या 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचे महत्वाचे योगदान होते. त्यांनी ग्रंथ मोहोळ यात्रा जळगाव जिल्ह्यात राबवली. त्यांच्या साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारितेमधील कार्याबद्दल त्यांना खान्देश हित साहित्यसंग्राम संस्थेतर्फे नुकताच नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनात जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी प्राचार्य डॉ. शकुंतला चव्हाण, मुलगी डॉ. स्वप्नाली व मुलगा निखिल हे आहेत. खान्देशातील कर्तुत्वान व्यक्तिमत्व आज हरपल्याने खान्देशी साहित्य क्षेत्राला मोठी क्षति पोहोचली आहे.

1 Comment
  1. Dharmendra Badgujar sir says

    भावपूर्ण श्रद्धांजली

Leave A Reply

Your email address will not be published.