भरधाव कार दुचाकीवर धडकली, दोन्ही मित्रांचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिरसोली गावाजवळील हनुमान मंदिराजवळ सायंकाळी ६.३० वाजता दुचाकीला भरधाव कारने समोरून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील मित्रांचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रफिक हुसेन मेवाती (वय २३) व अरबाज जहांगीर मेवाती (२०, दोन्ही रा. राणीचे बांबरूड, ता. पाचोरा) असे मृत मित्रांचे नावे आहेत.

राणीचे बांबरूड येथे रफिक मेवाती हा आई-वडील, तीन भाऊ व बहिणीसह वास्तव्यास होता. तो जळगाव शहरातील मास्टर कॉलनीमध्ये पेरू विक्री करायचा. नेहमीप्रमाणे सोमवारी सुध्दा रफिक मास्टर कॉलनीमध्ये पेरू विक्रीसाठी आला होता. दुसरीकडे त्याचा मित्र अरबाज याने दहा ते पंधरा दिवसांपूर्वी नवीन मिनी ट्रक खरेदी केला होता. त्यामुळे वाहनाच्या कामानिमित्त औरंगाबाद गेला होता. सायंकाळी तो जळगावात परतला. त्यानंतर रफिक आणि अरबाज हे एकाच दुचाकीने (एमएच.१९.सीएच.४३५९) घरी जाण्यासाठी निघाले.

शिरसोली गावाच्या काही अंतरावर असलेल्या हनुमान मंदिराजवळून रफिक, अरबाज हे जात असताना त्यांच्या दुचाकीला पाचो-याकडून शिरसोलीकडे भरधाव येणा-या कारने (एमएच.१९.बीजे.२१७५) समोरून धडकली दिली. यात रफिक, अरबाज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे कारचा पुढील भागाचा चुराडा झाला होता. तर दुचाकीच्या पुढील भागाचे देखील नुकसान झाले होते.

शिरसोली गावाजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरसोली ग्रामस्थांसह एमआयडीसी पोलिस ठाण्यातील जितेंद्र राठोड, समाधान टहाकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ रफिक आणि अरबाज यांना जिल्हा रूग्णालयात नेले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची गर्दी झाली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.